भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती

500 0

नवी दिल्ली- भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.

राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. 14 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. त्यांच्या जागी राजीव कुमार पदभार सांभाळतील. १५ मे २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२५ या दरम्यान देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर असणार आहे. घटनेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत असतो. राजीव कुमार हे १९८४ च्या बॅचचे आयएस अधिकारी असून २ सप्टेंबर २०२० रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती.

विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide