महत्वाची बातमी ! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा पुणे दौरा रद्द

369 0

पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पूर्वनियोजित दोन दिवसांचा पुणे दौरा आजपासून सुरु होणार होता. पण काही कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती समोर आली आहे.

नवीन वेळेनुसार राज ठाकरे आज रात्री उशिरा पुण्यात दाखल होणार असून उद्या ते पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेणार आहेत. अयोध्या दौऱ्याला जाण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधने आणि अयोध्या दौऱ्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नावनोंदणी कार्यक्रमाच्या उदघाटनाची राज ठाकर पुण्यात येणार होते.

दरम्यान अयोध्येला जाण्यापूर्वी पुण्यात एक जाहीर सभा घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे.
राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतल्याने मनसे नगरसेवक वसंत मोरे चर्चेत आले होते. आजच्या राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात त्यांची नाराजी दूर होणार का ? याची उत्सुकता आहे. उद्या वसंत मोरे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत अशी चर्चा आहे.

Share This News
error: Content is protected !!