‘… आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र, काय आहे या पत्रात ?

389 0

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा लावून धरल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. एकूणच राज्यात या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत शब्दामध्ये पत्र लिहून काही सवाल उपस्थित केले आहेत.

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मशीदीवरील भोंग्याविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणी हनुमान चालीसा लावून राज्य सरकारला आव्हान दिले. पोलिसांनी देखील मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. अनेक मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या. मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी पोलिसांचा चकमा देत पळून गेले. आता या दोन नेत्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी आकाश पाताळ एक केले आहे.

एकूणच या परिस्थितीवर आक्रमक झालेल्या राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी थेट सवाल केले आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हे पत्र शेअर केले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!