मोठी बातमी ! राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित ! कारण पुण्याच्या सभेत सांगणार

356 0

मुंबई- गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आलेला आहे.प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र नेमके कारण काय आहे याची ते पुण्यातील आगामी सभेमध्ये सविस्तर माहिती देणार आहेत. या बाबतचे ट्विट राज ठाकरे यांनी स्वतः केले आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तयारी मनसैनिकांकडून जोरदार सुरु होती. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची नावनोंदणी देखील सुरु करण्यात आली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते.

मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती खुद्द राज ठाकरेंनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे अयोध्या दौरा स्थगिती झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

Share This News
error: Content is protected !!