राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, ‘या’ कारणामुळे सभा रद्द केली

931 0

पुणे- मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील 21 मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेनेचे पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.

नदीपात्रात डेक्कन येथे राज ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन मनसेने केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी देखील मागण्यात आली होती. मात्र त्यासाठी पोलिसांनी काही अटी सांगितल्या होत्या. त्यानंतर मनसेने ही सभा पावसाचे कारण देत रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्र डेक्कन पोलिसांना देण्यात आले.

सभा रद्द झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सामना आता अनुभवता येणार नाही. राज ठाकरे हे देखील आता पुण्यातून मुंबईकडे रवाना झाला. अन्यथा त्यांचा चार-पाच दिवस पुण्यात मुक्काम ठरला होता.

पुण्यात राज ठाकरे यानी काल सुमारे 50 हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली. त्या वेळी माध्यमांनी त्यांचा पाठलाग केला. त्याला वैतागून जगू देणार की नाही, असा सवाल करत त्यांना झापले. पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांशी त्यांनी या दौऱ्यात संवाद साधला. मुंबई, ठाणे, औरंगाबाद अशा तीन ठिकाणी राज यांच्या गेल्या दीड महिन्यांत सभा झाल्या. चौथ्या सभेसाठी पुण्याची निवड करण्यात आली होती. पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज यांनी या शहरावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या सभेविषयी मनसैनिकांत उत्सुकता होती. सभा रद्द झाल्याने मनसैनिकांना आता पुढील दौऱ्याची वाट पाहावी लागणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!