राहुल गांधींचा तो व्हिडिओ व्हायरल, राहुल गांधी विचारत आहेत ‘मुझे बोलना क्या है ?'(व्हिडिओ)

510 0

नवी दिल्ली- अलीकडेच नेपाळमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला होता. आता आणखी एक व्हिडिओ शेअर करून भाजप नेत्याने राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमिल मालवीय यांनी शनिवारी सकाळी राहुल गांधींचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅन्डल वरून शेअर केला आहे. राहुल गांधी तेलंगणातील काँग्रेस नेत्यांची भेट घेत असतानाचा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये ते इतर अनेक काँग्रेस नेत्यांसोबत बसून भाषणापूर्वी राहुल गांधी विचारत आहेत, ‘मुझे क्या बोलना है ?’

राहुल गांधी दोन दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. राहुल शुक्रवारीच तेलंगणात पोहोचले आहेत. अमित मालवीय यांनी शेअर केलेल्या 17 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये राहुल गांधी काँग्रेस नेत्यांसोबत बसलेले दिसत आहेत. ज्यामध्ये राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत.

राहुल गांधी दोन दिवसांच्या तेलंगणा दौऱ्यावर आहेत. राहुल शुक्रवारीच तेलंगणात पोहोचले आहेत. शुक्रवारी आपल्या सभेपूर्वी त्यांनी काँग्रेस नेत्यांना मला नेमके काय म्हणायचे आहे, असा सवाल केला. अमित मालवीय यांनी १७ सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. राहुल गांधी विचारतायत ‘मुझे बोलना क्या है ?’

या व्हिडिओवर अमित मालवीय यांनी ट्विट केलंय की, काल राहुल गांधी तेलंगणातील त्यांच्या ‘शेतकऱ्यांसोबत एकता’ या रॅलीपूर्वी काय विषय आहे, काय बोलावे, असे विचारतात! जेव्हा तुम्ही खाजगी परदेशी सहली आणि नाईटक्लबिंगमध्ये राजकारण करता तेव्हा असे होते.

याआधी राहुल गांधी नेपाळमधील एका नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले होते, त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांना खूप ट्रोल केले होते. पत्रकार मित्राच्या लग्नात राहुल नेपाळला गेले होते.

Share This News
error: Content is protected !!