#PUNE : “…तर रविंद्र धंगेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार” पुण्यातील शिवसेना आक्रमक

493 0

#PUNE : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेले कसबा पेठ पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच मतदारांच्या घरोघरी जाऊन पैसे वाटले असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला. धंगेकरांनी केलेल्या या आरोपामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

परंतु आता धंगेकरांच्या याच आरोपांविरोधात पुण्यातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असल्याची पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या उपशहर प्रमुख ॲड. मोनिका खलाने यांनी तर थेट हे आरोप बिनबुडाचे आहेत धंगेकरांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकू असं सांगितल्याने आता धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

“रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बिनबुड्याचे जे पैसे वाटपाचे आरोप केले आहेत ते चुकीचे असून माझी धंगेकरांना विनंती आहे , कि त्यांनी पुराव्यासहित पोलिसांकडे तक्रार दाखल करावी अन्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी कारण हे सर्व आरोप खोटे असून फक्त आणि फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात येत आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसत असून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. परंतु जर २ दिवसात त्यांनी पुरावे सादर नाही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल” असा इशारा ॲड. खलाने यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

#VIRAL VIDEO : सेल्फी घेण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राची सोनू निगमला धक्काबुक्की; गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - February 21, 2023 0
चेंबूर : सोमवारी चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातरपेकर यांच्या वतीने एका फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फेस्टिवलमध्ये गायक…

गुवाहटीत शिवसेना पदाधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोण आहे हा पदाधिकारी ?

Posted by - June 24, 2022 0
गुवाहाटी- शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटी येथे गेलेल्या बंडखोर आमदारांना परत आणण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरत आहेत. आता…

स्वतःला बाळ होईना मंदिरातून पळवले अवघ्या सहा वर्षाच्या मुलाला; 90 CCTV व्हिडिओ धुंडाळून असे सापडले आरोपी

Posted by - March 7, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातून एक अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिलेला स्वतःला अपत्यप्राप्ती होत नव्हती. या कारणाने तिने एका सहा…

17 तासांच्या अज्ञातवासानंतर अजितदादा प्रकटले ! सर्वांचा एकच प्रश्न….एवढे तास कुठे होते ?

Posted by - April 8, 2023 0
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे काल दुपारी अचानक गायब झाले. सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार नॉट…
Shri Guruji Talim Ganpati

गणपती बाप्पा मोरया ! श्री गुरुजी तालीम गणपती आगमन सोहळा पहा टॉप न्यूज मराठीवर LIVE

Posted by - September 19, 2023 0
पुणे : ज्या लाडक्या बाप्पाची आपण वर्षभरापासून आतुरतेने वाट बघत असतो. तो बाप्पा आज विराजमान होत आहे. यंदाचा बाप्पाचा आगमन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *