पुणे : पुणे शहर पोलीस दलातील चार पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले आहेत. अंतर्गत बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार गुरुवारी आदेश दिले आहेत.
लोणी काळभोर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये दत्तात्रय लक्ष्मण चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी हे आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशनचा पदभार घेतील. तसेच राजेंद्र केशवराव मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर ते वाहतूक शाखा , विष्णू नाथा ताम्हाणे गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन , युनूस गुलाब मुलानी पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहकार ते नगर नियंत्रण कक्ष तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर ते पोलीस कल्याण कामकाज पाहतील.