नवऱ्याची पुणे पोलिसांकडे अजब तक्रार, पुणे पोलीस आयुक्तांनी दिला मोलाचा सल्ला

545 0

पुणे- आजकाल व्हाट्स अप हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. व्हाट्स अपवर काहीजण तासातासाला डीपी बदलतात तर काहींचा डीपी वर्षानुवर्षे तोच असतो. याच डीपी ठेवण्यावरून नवरा बायकोमध्ये वाद होतात. असाच एक वाद पोलिसांकडे पोहोचला आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या नवरोबाना अतिशय मोलाचा सल्ला दिला.

जनजागृतीचा भाग म्हणून नुकताच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरुन लाइव्ह वीथ सीपी पुणे सीटी या अंतर्गत सर्वसामान्यांशी ट्विटरवरुन संवाद साधला. यादरम्यान अनेकांनी वेगवगेळे प्रश्न गुप्ता यांना विचारले. याच उपक्रमात पुण्यातील प्रतीक कारंजे नावाच्या तरुणाने पोलिसांकडे अजब तक्रार केली आहे. माझ्या सोबतचा फोटो व्हाट्स अप वर डीपी म्हणून का ठेवत नाही या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण होत आहे. यासाठी मी पुणे पोलिसांच्या भरोसा सेलची मदत घेऊ शकतो का?”, असं प्रतीक यांनी ट्विटर अकाउंटवरून पोलिसांना विचारले.

https://twitter.com/pratikdkaranje/status/1523575925946093568

त्याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरवरून मोलाचा सल्ला दिला आहे. पोलीस आयुक्तांनी प्रतीकच्या प्रश्नावर उत्तर दिले की, नेहमी एकमेकांवर भरोसा ठेवं हे कायम चांगलं असतं. बाकी इतर घरगुती हिंसाचारासंदर्भातील तक्रारींसाठी तुम्ही कोणत्याही वेळी भरोसा सेलशी संपर्क करु शकता”

Share This News
error: Content is protected !!