Breaking news ! पुणे विमानतळावर बनावट तिकिटे दाखवून दोन जणांचा घुसखोरीचा प्रयत्न

217 0

पुणे- जयपूरला जाणाऱ्या विमानाची बनावट तिकिटे दाखवून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार पुणे विमानतळावर उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. या निमित्ताने विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गौतम शिंदे आणि मोहम्मद देसाई अशी या दोघांची नावे आहेत. यापैकी एकजण उडन टेकडी भागात राहतो. तर दुसरा कोंढवा भागात राहतो. दोघेही एअर एशियन विमान कंपनीच्या विमानातून जयपूरकडे जात होते.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. आरोपींकडे बनावट तिकीटे होती. ते जयपूरला जाणार होते. पण सुरक्षा यंत्रणांच्या वेळीच लक्षात आले. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडे बनावट तिकीटे आढळून आली. आरोपींचा यामागे नेमका काय उद्देश होता ते अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide