आता पुणे पोलिसांची मदत घेण्यासाठी डायल करा ११२

327 0

पुणे- येत्या काळात पुणे पोलिसांकडून एकमेव 112 ही नवी आपत्कालीन हेल्पलाईन जाहीर करण्यात आली आहे . पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ही हेल्पलाइन येत्या काळात वापरली जाणार आहे. याबाबतची माहिती पुणे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

112 या एकाच हेल्पलाईनवर आता पुणेकरांना पोलीस , रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि महिला हेल्पलाईन अशी एकत्रित मदत उपलब्ध असणार आहे. जीपीएसच्या यंत्रणेच्या सहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोणत्या ठिकाणावरुन आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. 100 नंबर असताना पोलिसांना आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता . कॉल नेमका कोणत्या तक्रारीसाठी आला ? याबाबत अनेकदा शंका असायची . कधी तक्रारदार चुकीची माहिती देत होते . मात्र आता त्या अडचणीपासून नागरिक किंवा पोलिसांची सूटका होणार आहे . त्यामुळे कमीत कमी वेळेत मदत करणे शक्य होणार आहे.

112 हा आपत्कालीन नंबर अमेरिकेच्या 911 या हेल्पलाईन नंबर सारखा असून इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम यांच्या अंतर्गत ही हेल्पलाईन सुरु केली जाणार आहे . याआधी आपल्याला पोलिसांची मदत हवी असेल तर 100 नंबर , महिला हेल्पलाईनसाठी 1091 आणि चाईल्ड हेल्पलाईनसाठी 1098 हे नंबर उपलब्ध होते. 112 या क्रमांकावर मदत मागितली तर घटनास्थळाजवळ गस्त घालणाऱ्या जीपीएस यंत्रणेवर त्याची माहिती जाईल. त्याद्वारे तक्रारदाराला तात्काळ मदत मिळेल.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!