पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

268 0

पुणे: ओबीसी राजकीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ची आरक्षण सोडत जाहीर झाली.

अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात 19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14 या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी 44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.

बालगंधर्व रंगमंदिरात पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर झाली.

Share This News
error: Content is protected !!