पारधी समाजसेविका सुमन काळे हत्याकांड प्रकरणात न्यायालयीन लढा उभारून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून झटणारे राष्ट्रीय स्वंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद लागू यांचे पुण्यात दि.०९ ऑक्टोबर २०२२ रोजी दुःखद निधन झाले.
मुकुंद लागू यांनी संपूर्ण जीवन अविवाहित राहून भटके विमुक्त , पारधी समाजाच्या उन्नतीसाठी तसेच अनेक विषयात शेवटपर्यंत ध्येयनिष्ठेने सामाजिक कार्य केले.
काही महिन्यांपूर्वी विवेक विचार मंच व लोकशाही जागर मंच च्या टीम ने नगर ला सुमन काळे यांच्या घरी भेट देवून कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी मुकुंदजी सोलापूर, मंगळवेढ्याहून स्वतः दुचाकी गाडी चालवत पुण्याला आले व तेथून कार्यकर्त्यांसोबत नगर ला आले होते. तेंव्हा त्यांनी सुमन काळे खून प्रकरण समजून सांगितले तसेच पारधी, भटक्या समाजाच्या समस्यांच्या बाबत माहिती दिली होती. यावेळी सुमन काळे यांचे बंधू श्री गिरीश चव्हाण यांच्या सोबत मुकुंद लागू यांचा फोटो घेतला होता.
मुकुंद लागू यांचा अनेक विषयातील अभ्यास होता. ज्येष्ठ लेखक प्रा.शेषराव मोरे सरांचे ते निकटवर्तीय होते. अशा या समर्पित ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यास भावपूर्ण श्रद्धांजली.