पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

256 0

पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत मेट्रोतून प्रवास करत येणार असल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुणे मेट्रो हे शहराच्या विकासाच्या दृष्टीने टाकण्यात आलेले मोठे पाऊल आहे,असे मानत पुणेकरही मेट्रोतून प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत.

येत्या 6 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर मेट्रो ट्रेन दिवसातून 12 वेळा गरवारे कॉलेज ते वनाज दरम्यान धावणार आहे. म्हणजेच सुरुवातीला एका तासाला ही गाडी प्रवाशांना सेवा पुरवेल.

ही आहेत वैशिष्ट्ये

*एका डब्यात 325, तर तीन डब्यांमध्ये असणार 975 प्रवासी
*दिवसभरात 11 हजार 700 प्रवाशांना करता येणार प्रवास
*एक डब्बा महिलांसाठी असणार राखीव
*पुणेकरांना 3 कोचच्या 34 मेट्रो ट्रेन पुरविणार सेवा
*वनाज येथे पार्किंग आणि देखभाल दुरूस्ती

असे आहे वेळापत्रक

*सकाळी पहिली गाडी – सकाळी 7 वाजता
*शेवटची गाडी – रात्री 10 वाजता
*दर तासाला किंवा अर्ध्या तासाला गाडी उपलब्ध
*तिकीट कमीत कमी 10 रु. जास्तीत जास्त 50 रु.

Share This News
error: Content is protected !!