PUNE COLLEGE STUDENT VIRAL VIDEO: किरकोळ कारणावरून पुण्यातील एका कॉलेज बाहेर विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा झाला.
दहा-पंधरा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने मिळून एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला. हा प्रकार पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याच्या डोक्यात वासा घालून त्याला गंभीर जखमी केलाय. (PUNE COLLEGE STUDENT VIRAL VIDEO) दरम्यान या विद्यार्थ्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यातील कन्स्ट्रक्शन साईटचा स्लॅब कोसळला; एक ठार, चार जखमी
या प्रकरणी इरफान मोहम्मद हुसेन कर्नुल, यांनी फिर्याद दाखल केली असून ते या जखमी विद्यार्थ्यांचे मामा आहेत.
पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये नुकत्याच झालेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला होता.
या निकालाच्या यादीत नाव शोधण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. याच गर्दीत एका विद्यार्थ्याचा इतर काही विद्यार्थ्यांना धक्का लागला.
केवळ धक्का लागण्याच्या कारणावरून दहा ते पंधरा विद्यार्थ्यांनी मिळून त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.
आरोपी विद्यार्थ्यांनी त्याच्या डोक्यात मोठा लाकडी वासा घातला. मारहाणीत हा विद्यार्थी रक्तबंबाळ झाल्यानंतरही हे विद्यार्थी त्याला मारहाण करत राहिले.
त्यावेळी एका वृद्धानं या सगळ्यांना हटकलं आणि या विद्यार्थ्यांच्या हातातून वासा हिसकावून घेतला.
PUNE VIMANTAL POLICE: विमानतळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई, तीन लाख रुपये किंमतीचा १२ किलो गांजा जप्त
त्यामुळे या विद्यार्थ्याचे प्राण वाचले. या गंभीर परिस्थितीतही विद्यार्थ्याने प्रसंगावधान दाखवत त्याच्या मामाला फोन करून घडलेली घटना सांगितली.
त्यावेळी मामाने घटनास्थळीत धाव घेत भाच्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू असून आरोपी विद्यार्थ्यांना विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या मारहाणीचा खळबळ जनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Pune Crime News : व्हिडिओ बनवून तरुणाची आत्महत्या ; नेमकं कारण काय ?
SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा