धाराशिवच्या उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील कॅडेट वैभवी गोपाळ शेंडगे हिची प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या RDC संचलन परेडसाठी निवड झाली आहे. राजपथावर होणाऱ्या पंतप्रधान रॅलीसाठी ड्रिल मधून वैभवीची महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड झाली आहे.प्रत्येक वर्षी होणाऱ्या या संचलनासाठी देशभरातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातून एनसीसी कॅडेटस ड्रिल परेड व इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत असतात.यासाठी अनेक कठीण चाचण्या, परीक्षा पूर्ण करून कॅडेटस इथपर्यंत पोहचतात. प्रत्येक कॅडेटचे एनसीसीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सर्वात मोठे उदिष्ठ, स्वप्न याच शिबीराचे असते. रात्र -दिवस एक करून हे कॅडेटस याची तयारी करत असतात. हे शिबीर कॅडेटसचे भवितव्य ठरवणारे असते.
धाराशिवच्या उमरग्यातील मौजे कोरेगाववाडी या छोट्याश्या खेडेगावातून अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करून स्वतःच्या जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमातून वैभवीने आपले स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. वैभवी ही एका शेतकऱ्याची कन्या आहे. शेतकऱ्याच्या या लेकीचं संपूर्ण उमरगा तालुकाच नव्हे तर धाराशिव जिल्हयातून देखील कौतुक होत आहे.वैभवीला 53 महाराष्ट्र एनसीसी बरालिएन लातूरचे कमान अधिकारी कर्नल वाय बी सिंग व त्यांच्या सर्व सैन्यदलातील संघ व कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी मार्गदर्शन लाभले. तिची निवड झाल्याबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल भैया मोरे, उपाध्यक्ष अश्लेष भैया मोरे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळातील सदस्यांनी कौतुक व अभिनंदन केले. तसेच परेडमध्ये सहभागी झाल्याबदल प्राचार्य डॉ संजय अस्वले, उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पद्माकर पिटले, प्रा गुंडाबापु मोरे, शैलेश महामुनी, नितीन कोराळे, राजकुमार सोनवणे तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका सर्व कॅडेटस, विद्यार्थी, कर्मचारी यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.