बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याऐवजी आमच्याशी थेट निवडणूक लढा, असे आव्हान शिवसेना(SHIVSENA)ठाकरे गटाचे नेते संजय राऊत(SANJAY RAUT) यांनी दिले आहे. चिन्ह आणि पक्ष घेतला असला, तरी आम्ही अजूनही तुमच्याशी लढत आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे राजकारण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
ठाण्यात शिवसेना (ठाकरे गट)च्या तीन उमेदवारांना माघार घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE)यांच्या बंगल्यावर नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर संबंधित उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचेही राऊत यांनी सांगितले.
या प्रकरणी रविवारी ठाकरे गटाचे नेते राजन विचारे(RAJAN VICHARE) आणि मनसे नेते अविनाश जाधव(AVINASH JADHAV) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिस शिवसेनेच्या(SHIVSENA)उमेदवाराला हाताला धरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केले.
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत (SANJAY RAUT) म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी आपल्या वर्दीची शान न राखता सत्तेच्या दबावाखाली काम केल्याचे यातून स्पष्ट होते. हे चित्र निवडणूक आयोगासमोर आल्यानंतर आयोग काय भूमिका घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.