प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर फेटाळली, काँग्रेस पक्षात जाणार नाही

548 0

नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला असून प्राधान्य किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनी याबाबत ट्विट केले आहे. प्रशांत किशोर यांनी देखील ट्विट करत काँग्रेसची ऑफर नाकारली असल्याचे म्हटले आहे.

प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीमध्ये काँग्रेसला २०२४ मध्ये सत्तेत येण्यासाठी काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपवण्यात आली होती. काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जातील अशी अटकळ बांधली जात होती

या सर्व चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून प्रश्नात किशोर यांनी स्वतः ट्विट करून काँग्रेसची ऑफर नाकारत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये मोठे बदल घडविण्यासाठी आणि काँग्रेसच्या संरचनात्मक समस्या दूर करण्यासाठी माझ्यापेक्षा सक्षम आणि सामूहिक इच्छाशक्तीची आवश्यकता आहे असे माझे विनम्र मत आहे. असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील ट्विट करून ही माहिती दिली आहे. सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर, काँग्रेस अध्यक्षांनी एक सक्षम कृती गट 2024 तयार केला आहे आणि त्यांना गटाचा भाग होण्यासाठी आणि पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र प्रशांत किशोर यांनी तसे करण्यास नकार दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!