दूरदर्शनचा आवाज हरपला ! ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

409 0

पुणे- दूरदर्शन वरील ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे (वय ६५) यांचं मुंबईत निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाजामुळे प्रदीप भिडे हे दूरदर्शनची ओळख बनले होते.

मुंबई दूरदर्शन केंद्राची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972 ला झाली. प्रदीप भिडे 1974 पासून ते दूरदर्शनमध्ये दाखल झाले. दूरदर्शनमध्ये जवळपास ४२ वर्ष त्यांनी वृत्तनिवेदन केलं. भिडे यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी केलेलं वृत्तनिवेदन, त्यांची बातम्या वाचण्याची शैली आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

स्मिता पाटील, भक्ती बर्वे, ज्योत्स्ना किरपेकर, अनंत भावे हे सगळे त्यांचे समव्यावसायिक होते. वयाच्या 21 व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली.
वृत्तनिवेदनासह त्यांनी अनेक जाहिरातपट, लघुपट, माहितीपटात त्यांनी आवाज दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!