POST OFFICE: मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांनी घेतला डाकघरांच्या कामकाजाचा आढावा

52 0

दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे येथे श्री. अमिताभ सिंह, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र व गोवा सर्कल यांचेमार्फत पुणे ग्रामीण डाक विभागातील काही निवडक शाखा डाकघरांच्या कामकाजाचा आढावा व शाखा डाकपाल यांचे सोबत संवाद साधण्यात आला.
सदर बैठकीसाठी तळेगाव दाभाडे, वडगाव, लोणावळा तसेच राजगुरुनगर, चाकण भागातील ७०-७५ हून अधिक ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते. कामाच्या आढाव्यासोबत रजिस्टर /स्पीड पोस्ट पंजीकरण, बचत खाते संपादन आणि विमा पॉलिसी खरेदीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नउ ग्रामीण डाक सेवकांना त्यांच्या उत्कृष्टतेसाठी गौरविण्यात आले.
श्री. अमिताभ सिंह यांनी आढावा घेताना ग्रामीण डाक सेवकांबरोबर संवाद साधत जास्तीत जास्त उद्धिष्ट पूर्तीसाठी अहवान केले. तसेच दैनंदिन कामामधील समस्यांबाबत विचारणा केली. त्याच सोबत भारतीय डाक विभागाचे प्रतिनिधित्व करताना आधुनिक सेवा, डिजिटल व्यवहार व इतर ग्रामीण वित्तीय सेवा वाढवणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमामध्ये ग्रामीण डाक सेवकांच्याशी संवाद साधताना, त्यांच्याकडूनही काही मते / अनुभव मांडण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामध्ये काही होतकरू ग्रामीण डाक सेवकांनी त्यांचे अनुभव / मते सादर केली.
शाखा डाकघर स्तरावर e-kyc सुविधा, शाखा डाकघरांचे नूतनीकरण, डाकघराच्या काही जुन्या खातेप्रकारांना जसे की मासिक प्राप्ती योजना, जेष्ठ नागरिक अश्या खातेप्रकारांना शाखा डाकघरामध्ये उघडण्याची सोय, PLI/RPLI या विमा पॉलिसी मधे नवीन सवलतीं अश्या अनेक सूचनांवर विचार विनिमय करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्री. अभिजित बनसोडे, संचालक, पुणे डाक क्षेत्र तसेच डाक विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!