मी जे बोलतो ते करतो आणि जे बोलत नाही तेही करून दाखवतो. कमी बोलणं आणि जास्त काम करणं हीच माझी ओळख आहे,” असे ठाम मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) यांनी व्यक्त केले. अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
अमरावती(AMRAVATI) महापालिकेत आतापर्यंत सर्वच पक्षांची सत्ता आली असून आता शहराच्या विकासासाठी शिवसेनेचा अनुभव घेण्याची वेळ असल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेनेचा(SHIVSENA) एकमेव अजेंडा विकास असून सत्तेसाठी नव्हे तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करतो, असा दावा त्यांनी केला.
लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांमधील यशाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, पदे महत्त्वाची नसून सर्वसामान्यांना न्याय देणे हेच शिवसेनेचे ध्येय आहे. महापालिका निवडणुकीत बदल हवा असेल तर धनुष्यबाण हाच पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अमरावतीतील(AMRAVATI) कचरा व मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देत, महिलांच्या अडचणी लक्षात घेऊनच ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.