मुंबईबाबत(MUMBAI) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप(BJP) नेते अण्णामलाई यांच्यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अण्णामलाई यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर संबोधत ते महाराष्ट्राचे शहर नसल्याचे विधान केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप नेते अण्णामलाई यांच्यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अण्णामलाई यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर संबोधत ते महाराष्ट्राचे शहर नसल्याचे विधान केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणून संबोधण्याच्या प्रवृत्तीवरही आदित्य ठाकरे(ADITYA THACKAREY) यांनी आक्षेप घेतला. मुंबईकर योग्य वेळी भाजपला धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, ठाकरे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे (AKHIL CHITRE)यांनीही व्हिडिओ ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रचारसभांना वेग आला आहे