पोलीस खात्यात सामील व्हायचंय ? पोलीस भरती सुरु होणार ! तयारीला लागा

547 0

मुंबई- पोलीस भरतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच मेगा पोलीस भरती होणार आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये सामील होण्याची उच्च असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

कॉन्स्टेबल पदासाठी एकूण 7 हजार जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेनंतर आणखी एक जम्बो पोलीस भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया छांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वर्षातून एकदा पोलीस भरती ही होत असते. पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून वर्षभर ही लोकं तयारीला लागतात. पोलीस दलात सेवा बजावण्याचे यांचे स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशा तरूणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!