पोलीस होण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
पोलीस भरती बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून
गृह विभागाकडून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे 15000 पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून भरतीचा सराव मुलं करत होती
मात्र भरतीबद्दल सरकारकडून कोणत्याही प्रकारची घोषणा होत नसल्यामुळे तरुणाई मध्ये चिंता पसरली होती.
महाराष्ट्र पोलीस दलात ही एक प्रकारची मेगाभरतीच म्हणावी लागेल.
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय.
दरम्यान महापालिकांच्या निवडणुकांच्या अगोदरच ही भरती प्रक्रिया पार पडेल अशी एक चर्चा आहे
15,000 जागांसाठी लाखांच्या घरात उमेदवारांचे अर्ज येण्याची ही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
KHED KUNDESHWAR NEWS: कुंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला;9 जणांचा मृत्यू 25 जण जखमी
अनेक तरुण,तरुणी पोलीस भरतीचे स्वप्न पाहतात एवढेच नाही
तर त्या दिशेने प्रयत्नही करत असतात. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्प्यांसाठी सखोल तयारी
आता या मुलांना करावी लागणार आहे.
भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रता निकष
आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया या सगळ्याची माहिती समोर येणार आहे.