नवी दिल्ली- रशिया-युक्रेन युद्धाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम स्पष्टपणे दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलनंतर आता एलपीजीच्या दरातही वाढ झाली आहे. 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. आता घरगुती एलपीजीची किंमत 949.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून वाढलेले दर लागू होणार आहेत. यापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ केली होती. याआधी 6 ऑक्टोबर रोजी एलपीजीच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या.
यापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 70 पैशांनी महागलं आहे. वाढलेले दर आज सकाळपासून लागू झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल १३७ दिवसांनी वाढ झाली आहे. 4 नोव्हेंबर 2021 नंतर किमती प्रथमच बदलल्या आहेत.
रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता तेल कंपन्यांनीही इंधनाच्या दरात वाढ केली आहे.