महापालिका निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS)यांनी पुणे (PUNE)आणि पिंपरीचिंचवडमध्ये(PCMC) भाषणांसह मुलाखतींमधून विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. शेरो-शायरीच्या माध्यमातून त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांना लक्ष्य केले.
प्रचाराच्या शेवटच्या रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये(PCMC)रोड शो केल्यानंतर पुण्यात मुलाखतीच्या माध्यमातून पुणेकरांशी संवाद साधला. गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याच्या प्रश्नावर उत्तर देत असताना शायरीने उत्तराची सुरुवात केली. “तमाम उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना पोछता रहा,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.
यानंतर त्यांनी गुन्हेगारीविरोधात आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, एकीकडे शहर गुन्हेगारीमुक्त करण्याच्या घोषणा केल्या जातात, तर दुसरीकडे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जाते. “गृहमंत्री म्हणून पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असे गुन्हेगार निवडून आले, तर त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल,” असे फडणवीस म्हणाले.
याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR) यांनी मोशी येथे शायरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. “हर पंख फैलाने वाला परिंदा उड नहीं पाता. घमंड आणि चुकीच्या दिशेमुळेच स्वप्ने तुटतात. केवळ बोलून नाही, तर मैदानात उतरून काम करून दाखवणाऱालाच जनता ओळखते,” असे ते म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेरो-शायरीतून झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय तापमान चढले आहे.