पुणे : आज जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता पुणे अग्निशमन दलाने महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले होते.
तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर बॉम्बसदृश्य आवाजाने धमाका होताच महापालिका हादरली. त्यावेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांना ही कदाचित याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने एकच धांदल उडाली होती.
अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असता, घटनास्थळी यावेळी अधिकारी आणि जवान यांनी परिस्थिती अगदी उत्तमरित्या हाताळत दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यवाही यशस्वीरित्या पार पडली. नंतर ही मॉक ड्रिल असल्याचं समजल्यावर उपस्थित त्यांनी सुटकेचा निष्वास सोडला.