आता पुराव्यांशी छेडछाड होणार नाही; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’चे लोकार्पण

1679 0

महाराष्ट्र सरकारने अनुकूल अशा मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार केल्या आहेत. या प्रत्येक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य असणार आहे, तिथे साइंटिफिक ॲनालिस्ट आणि केमिकल ॲनालिस्ट ज्यांना फॉरेन्सिक एक्स्पर्टचा दर्जा आहे, ज्यांचं सर्टिफिकेशन झालंय, ते या व्हॅनमध्ये उपस्थित असतील. क्राईम सीनवर जाऊन तो ताब्यात घेऊन, तेथील जो पुरावा, एव्हिडन्स असेल तो ते जमा करतील, त्यामध्ये ब्लड सॅम्पल, नार्कोटिक सॅम्पल, एखाद्या स्फोटाचे सॅम्पल असू शकतं. त्या प्रत्येकाचं जागेवर टेस्टिंग करण्याचे किट उपलब्ध आहे. त्यामुळे आता कोणीही पुराव्यांअभावी कोणीही सुटणार नाही यासाठी ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.

या व्हॅन्समुळे घटनास्थळीच पुरावा तपासणी आणि संकलन शक्य होणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून पुराव्यांची अखंडता राखली जाईल. 256 व्हॅन्स तयार करण्याचे नियोजन आहे, 21 व्हॅन्स सध्या वापरात आहेत. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात आणि अपराध सिद्धी दरात वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.आपल्याला अनेक केसेसमध्ये योग्य पुराव्याअभावी आरोपी सुटताना दिसतात, पण आता तसं होणार नाही. त्याच ठिकाणी या किटच्या माध्यमातून 100 टक्के प्राथमिक आणि अंतिम निष्कर्ष घटनास्थळी काढता येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जवळपास 256 व्हॅन्स आम्ही तयार करणार आहोत, 21 व्हॅन्स सध्या रोलआऊट केलेल्या आहेत. सगळ्या व्हॅन्स रोलआऊट होऊन सगळीकडे उपलब्ध होतील असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

Share This News
error: Content is protected !!