रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पुन्हा मास्क सक्ती

406 0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रश्नांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी पत्र जारी केले आहे.

कोरोनाची लाट ओसरली होती आणि त्यामुळं राज्य सरकारने कोरोनाचे सर्व नियम शिथिल केले. परंतु, आता कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे आणि दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली आहे. त्यामुळं या संदर्भात आधीच खबरदारी घेऊन प्रवाशांसाठी मास्क घालने बंधनकारक करण्यात आले आहे.

शर्मा यांनी जरी केलेल्या पत्रानुसार मास्क घातल्यानंतरच स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, रेल्वेत प्रवास करताना सुद्धा मस्कचा वापर करावा लागणार आहे. देशात काही भागामध्ये कोरोना रुग्ण वाढू लागेल आहे. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!