केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हायड्रोजन कारमधून संसदेत पोहोचले ! काय आहे ही कार ?

231 0

नवी दिल्ली – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आज ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या सुसज्ज कारमधून संसदेत आगमन झाले. शुभ्र पांढऱ्या रंगाच्या या कारमधून गडकरींनी प्रवास केला असून महागलेल्या इंधनावर हायड्रोजन इंधनाचा पर्याय ठरेल, असा दावा गडकरींनी यावेळी केला.

टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही अत्याधुनिक कार बनवण्यात आली असून या मिराई कारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज संसदेत जाताना गडकरींनी याच कारने प्रवास केला. ही कार अॅडव्हान्स सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या मिश्रणातून वीज निर्माण करते आणि त्यानंतर ही कार धावते. या कारमधून फक्त पाणी उत्सर्जनाच्या स्वरूपात बाहेर येते.

काही दिवसांपूर्वीच टोयाटो कंपनीने ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणारी भारतातील पहिली वहिली कार समोर आणली होती. टोयोटा कंपनीच्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही अत्याधुनिक कार बनवण्यात आली असून या गाडीचे नाव ‘मिराई’ आहे, ज्याचा हिंदीत अर्थ भविष्य असा होतो. तीन हायड्रोजन सिलेंडर कारमध्ये असून हायड्रोजन कार म्हणून ही भारतातील पहिलीच कार असल्याने यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. कारमध्ये 1.4 किलोवॅटची बॅटरी आहे. कारच्या मायलेजचा विचार करता एका सिलेंडरमध्ये 5.6 किलो हायड्रोजन भरण्याची क्षमता असून एका सिलिंडरवर ही कार 650 किमी प्रवास करु शकते

Share This News
error: Content is protected !!