पोलिसांना 10 मिनिटं बाजूला करा; नितेश राणे यांचं अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान

487 0

औरंगाबाद – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी काल औरंगजेबाच्या कबरीचा दर्शन घेतल्यानंतर राज्यातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून ओवीसी यांच्यावर टीका होत आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत अकबरुद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले आहे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात मी आव्हान करतो,

पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!

…. तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल !

औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होतोय. औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. संजय राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!