नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला, अटकेची टांगती तलवार

130 0

सिंधुदुर्ग – सतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे, त्यामुळे नितेश राणेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

सतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली तिथे त्यांचा जामीन फेटाळला, त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली तिथे देखील त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर राणें यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. या ठिकाणी देखील त्यांच्या पदरी निराशा पडली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा दिवस अटकेपासून संरक्षण देत पुन्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची सूचना केली. सिधुदुर्ग सत्र न्यायालयात राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. आज या प्रकरणाचा निकाल देत न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे नितेश राणेंच्या अटकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. परब यांना 4 फेब्रुवारी पर्यंतची न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयासमोर नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. जामीन फेटाळल्यानंतर निलेश राणे आणि पोलिसांत बाचाबाची झाली. मला कायदा शिकवू नका अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश राणे गाडीतून खाली उतरले आणि न्यायालयात गेले. त्याआधी त्यांनी त्यांच्या वकिलांशीही चर्चा केली.

Share This News

Related Post

#CRIME : मंत्र तंत्र म्हणून हातावर कापूर जाळायचा आणि पीडित विद्यार्थ्याला ‘तांत्रिक शरीरसंबंध’ करायला भाग पाडायचा; मुंबईतील उच्चशिक्षित दांपत्याचा विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार

Posted by - February 13, 2023 0
मुंबई : मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्यासोबत एक भयानक प्रकार घडला आह. एका समलैंगिक ॲपच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर उच्चशिक्षित दांपत्याने या…
AJIT PAWAR

राष्ट्रवादीच्या फक्त त्याच लोकांना विधानसभेचे तिकीट मिळणार; अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Posted by - June 4, 2023 0
मुंबई : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा सोमवारी वाढदिवस आहे, या निमित्ताने नागपुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी…

RBI ने ठोठावला 13 बँकांना दंड ! महाराष्ट्रातील ‘या’ बँकांवर होणार दंडात्मक कारवाई

Posted by - December 13, 2022 0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 13 कोर्पोरेटिव बँकांना नियमांचं पालन न केल्याने 50 हजार रुपयांपासून 4 लाखांपर्यंतचा दंड ठोठावला आहे.…

मोठी बातमी : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू

Posted by - January 19, 2023 0
मुंबई-गोवा महामार्ग : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे ४ ते ५ च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका चिमुकलीसह ८…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *