NIRMALA NAVLE

NIRMALA NAVLE : डिजिटल प्रसिद्धी विरूद्ध प्रत्यक्ष जनसंपर्क ;कारेगावच्या निकालाने शिकवला नवा धडा

79 0

शिरूर (SHIRUR) तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत कारेगावच्या (KOREGAON) माजी सरपंच निर्मला नवले(NIRMALA NAVLE) यांचा पराभव झाला असून भाजपच्या(BJP) मनीषा पाचंगे (MANISHA PACHANGE) यांनी सुमारे २,७०० मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. हा निकाल सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर(SOCIAL MEDIA) मोठी लोकप्रियता आणि प्रचारसभांना गर्दी असूनही निर्मला नवले(NIRMALA NAULE) यांना अपेक्षित यश मिळाले नाही. प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी वेगळाच निर्णय घेतल्याचे चित्र दिसले. दुसरीकडे, मनीषा पाचंगे(MANISHA PACHANGE) यांनी घराघरात जाऊन प्रचार करत स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. या जमिनीवरच्या कामाचा फायदा त्यांना निकालात झाल्याचे बोलले जात आहे.

आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले(NIRMALA NAULE)  यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP)उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र भाजपने(BJP) येथे बाजी मारत राष्ट्रवादीला धक्का दिला.

या निकालामुळे सोशल मीडियावरील (SOCIAL MEDIA)लोकप्रियतेपेक्षा मतदारांशी थेट संपर्क आणि स्थानिक पातळीवरील काम किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, या पराभवानंतर निर्मला नवले(NIRMALA NAVLE) यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!