राष्ट्रवादी काँग्रेसने मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

404 0

पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत.

राज्यात महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी अलीकडेच स्वबळाचा नारा दिला होता. राष्ट्रवादीने 122 जागा जिंकून सत्ता सतःपण करू असाही दावा करण्यात आला होता. आता पक्षाकडून शहरातील इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून निरीक्षकांना इच्छुक उमेदवारांचे अर्ज व कार्यअहवाल स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील सात ते आठ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली. विधानसभा मतदार संघनिहाय निरीक्षक आणि प्रभाग अध्यक्षांच्या माध्यमातून अर्ज स्वीकारले जातील.

Share This News
error: Content is protected !!