नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना ईडीकडून समन्स; चार्जशीट दाखल करण्याची शक्यता

459 0

मुंबई- टेरर फंडिंगच्या रोपाखाली सध्या ईडीच्या ताब्यात असलेले राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांच्या दोन्ही मुलांना समन्स पाठविण्यात आले असून ईडी कडून लवकरच चार्जशीट दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाब मलिक यांची दोन मुले अमीर मलिक आणि फराज मलिक यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यांच्या दोन्ही मुलांना ईडीने अनेकदा समन्स बजावल्यानंतरही दोन्ही मुले चौकशीसाठी हजर झाली नाहीत. फराज मलिकला ईडीने तीन वेळा तर अमीर मलिकला दोनदा समन्स बजावले होते. फराज मलिक याला 15 मार्च रोजी समन्स बजावले होते. मात्र, तो ईडीसमोर हजर झाला नाही. त्यानंतर ईडीनं दुसरं समन्स दिलं होतं. त्यानंतरही फराज चौकशीसाठी हजर राहिला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 22 एप्रिलला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिकवर आज किंवा उद्या ईडी आरोपपत्र दाखल करू शकते. मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरातून चौकशीसाठी बोलावले आणि नंतर अटक केली. याच प्रकरणात मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची काही मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!