नवनीत राणा यांची तुरुंगातून सुटका, प्रकृती बिघडल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार वैद्यकीय तपासणी

366 0

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे खासदार नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती. त्यांना भायखळा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, तुरुंगात १२ दिवसांच्या वास्तव्यामुळे नवनीत राणा यांना प्रकृतीच्या अनेक तक्रारी सुरु झाल्या आहेत.

नवनीत राणा यांची भायखळा जेलमधून सुटका झाल्यानंतर नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाल्या. आता लिलावती रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी केली जाईल. त्यानंतर नवनीत राणा यांच्यावर पुढील उपचार केले जातील.

Share This News
error: Content is protected !!