मोठी बातमी ! नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील मुक्काम वाढणार, उपचार सुरु

267 0

मुंबई- जामिनावर सुटका झालेल्या खासदार नवनीत राणा या गुरुवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाल्या. स्पॉन्डिलिसिस च्या आजारामुळे त्यांची तब्येत बिघडली. आज त्यांना डिस्चार्च मिळण्याची शक्यता कमी असून त्याचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला.

त्यानंतर नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. नवनीत राणा यांची भायखळा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मजूर केल्यानंतर त्यांची सुटका झाली. दरम्यान मानेच्या विकारामुळे नवनीत राणा यांची तब्येत बिघडली. तुरुंगातून सुटका होताच काल गुरुवारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजून त्यांची तब्येत ठीक नसल्याने राणा यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार आहे.

Share This News
error: Content is protected !!