नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात, ट्रकला धडकल्यानंतर बस उलटली

238 0

नाशिक- मेडिकल कॉलेजच्या स्टाफला घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला जोरदार धडक बसून अपघात झाला. ट्रकला धडक दिल्यानंतर बस उलटली. या मध्ये 20 ते 25 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना नाशिकमध्ये नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मेडिकल कॉलेजच्या स्टाफला घेऊन ही बस निघाली होती. या बसमध्ये मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टर आणि कर्मचारी होते. बस आणि ट्रक यांच्यात समोरा समोर हा अपघात झाला. त्यानंतर बस उलटली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचासाठी खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!