नारायण राणे यांचे ट्विट, ‘शाब्बास एकनाथजी… नाही तर तुझा आनंद दिघे झाला असता’

453 0

मुंबई- स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या भूमिकेत असलेल्या एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. नारायण राणे यांनी सूचक ट्वीट करत मोठे वक्तव्य केले आहे.

विधान परिषद निवडणुकीला २४ तास उलटत नाही तोपर्यंत शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची कुणकुण लागली होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातला रवाना झाले. सुरत येथील एका हॉटेलात त्यांचा मुक्काम आहे.

या सर्व घडामोडींवर नारायण राणे यांनी ट्विट केले आहे. नारायण राणे यांनी ‘…नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता’ अशा आशयाचे ट्विट केले आहे.

शिवसेनेचे एकूण ३५ आमदार शिंदेसोबत असल्याचा दावा गुजरातमधील भाजपा नेत्यांनी केला आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदार सूरतमध्ये असल्याचं समोर आलं होतं. मात्र, आता हा आकडा वाढत आहे. हा आकडा अतिशय मोठा असून भाजपचा हा दावा खरा असल्यास हा शिवसेनाला जबर धक्का असेल.

Share This News
error: Content is protected !!