नागपुर रेल्वे स्थानक परिसरात स्फोटकाची बॅग, बॅगमध्ये 54 जिलेटिनच्या कांड्या

344 0

नागपूर- येथील रेल्वे स्थानक परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे स्थानक परिसरात जिवंत स्फोटके असलेली बेवारस बॅग सापडली आहे. जिलेटिनच्या 54 कांड्यासहित बॉम्ब सदृश वस्तू या बॅगमध्ये आढळून आल्या आहेत. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ट्राफिक पोलीस चौकीच्या मागे बेवारस अवस्थेत ही बॅग आढळून आली. घटनेची माहिती मिळताच बीडीडीएसचं पथक घटनस्थळी दाखल झालं. या बॅगची तपासणी केल्यानंतर त्यात जिलेटिनच्या कांड्या सर्किटद्वारे एकमेकांना जोडलेल्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. तपास यंत्रणांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

रेल्वे स्टेशनच्या परिसरातून ही बॅग बीडीडीएसच्या खास गाडीतून नेण्यात आली. पोलिस पुढील तपास करत आहेत. वेळीच ही बॅग सापडल्याने मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

 

 

Share This News
error: Content is protected !!