samadhan sarvarkar shivsena

“माझा पराभव ठरवून केला गेला” समाधान सरवणकरांचा भाजपवर खळबळजनक आरोप

56 0

मुंबई महापालिका निवडणुकीत(BMC)भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे(EKNATH SHINDE) यांच्या शिवसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडकीस आले आहेत. वॉर्ड क्रमांक १९४ मधील पराभवासाठी शिवसेना (SHIVSENA)शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर (SAMADHAN SARVANKAR) यांनी थेट भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रभादेवी वरळी(VARALI) परिसर हा शिवसेनेचा (SHIVSENA) पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र या निवडणुकीत वॉर्ड १९४ मधून समाधान सरवणकर(SAMADHAN SARVANKAR) यांना पराभव स्वीकारावा लागला असून ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे(NISHIKANT SHINDE विजयी झाले आहेत. निकालानंतर सरवणकर यांनी आपला संताप व्यक्त करत भाजपच्या (BJP)  एका गटामुळे आपला पराभव झाल्याचा दावा केला आहे.

सरवणकर म्हणाले की, निवडणुकीदरम्यान भाजपच्या (BJP) काही नेत्यांनी सहकार्य केले, मात्र भाजपच्या (BJP) एका विशिष्ट पदाधिकाऱ्याने युती धर्माला हरताळ फासला. माझ्या प्रभागात मला पराभूत करण्यासाठी चार पाच आमदार आणि दोन पक्षप्रमुखांची मुले तळ ठोकून होती. सर्वांचे लक्ष्य मीच होतो. मतदार माझ्या बाजूने होते, मात्र नियोजनबद्ध पद्धतीने मला पाडण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच भाजपच्या(BJP) संबंधित पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना व्हॉट्सॲपद्वारे सरवणकरांना( SAMADHAN SARVANKAR) मदत करू नये, असे संदेश पाठवले होते, असा दावाही त्यांनी केला. वरून आदेश आल्याचे भासवून कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यात आली आणि त्यामुळे प्रचारातील मदत जाणीवपूर्वक रोखण्यात आल्याचा आरोप सरवणकर यांनी केला आहे.

या आरोपांमुळे महायुतीतील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आगामी काळात यावर भाजपकडून काय भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .

Share This News
error: Content is protected !!