Breaking News ! औरंगाबादच्या जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून

678 0

पुणे- औरंगाबाद जेलरच्या मुलाचा पुण्यातील ग्लायडिंग सेंटरमध्ये खून कारागृहाचे जेलर उत्तरेश्वर गायकवाड यांचा मुलगा गिरीधर याचा हडपसर ग्लायडिंग सेंटरमध्ये मध्यरात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार एका तरुणीसह पाच जणांनी गिरीधरचा खून करुन सासवडरोडच्या दिशेने पळ काढला. गिरीधर हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असून काल रात्री त्याला एकाने फोन करून बोलावून घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.

अधिक माहिती अशी की उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावर २०१४ मध्ये कोल्हापूर येथे कारागृहाचे सर्कल ऑफिसर असताना त्यांच्यावर भास्कर गँगमधील गुन्हेगारांनी जीवघेणा हल्ला केला होता. तसेच त्यांच्या कारचे देखील मोठे नुकसान केले होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते.

Share This News
error: Content is protected !!