मुकेश अंबानींचा मोठा निर्णय ! रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा, आकाश अंबानी यांना संधी

372 0

मुंबई- आशियातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी (२८ जून) रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली. जिओचे नेतृत्व आता मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांच्याकडे देण्यात आले आहे.

रिलायन्स जिओ दूरसंपर्क सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मुकेश अंबानी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे जिओने म्हटलं आहे. २७ जून रोजी रिलायन्सच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीतच रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी आकाश अंबानी यांची नियुक्ती निश्चित करण्यात आली. २७ जूनला मुकेश अंबानी यांनी तात्काळ अंमलबजावणीच्या प्रभावाने राजीनामा दिला. यानंतर आकाश अंबानींच्या नियुक्तीचा निर्णय झाला.

याशिवाय जिओच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी कंपनीचे विद्यमान बिगर कार्यकारी संचालक आणि मुकेश अंबानी यांचे चिरंजीव आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २७ जून २०२२ रोजी रिलायन्स जिओच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात आकाश अंबानी यांच्या नियुक्ती घोषणा झाली.

 

Share This News
error: Content is protected !!