मदर्स डे निमित्त मुलाची आईला अनोखी भेट, आई आणि मुलाने जोडीने केले विमान उड्डाण, पाहा व्हिडिओ

482 0

आई आणि मुलाचे नाते याबद्दल कितीही वर्णन केले तरी ते अपुरेच ठरते. आईसाठी आपला मुलगा आणि मुलासाठी आपली आई जिवाच्या पल्याड प्रिय असते. सध्या एक असाच अतिशय भावणारा, व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. यामध्ये आई मुलाचे भावनिक नाते अनुभवायला मिळते. हा व्हिडिओ आहे एका विमानातील ज्यामध्ये आई आणि मुलगा दोघेही वैमानिक आहेत आणि त्यांनी जोडीने विमानउड्डाण केले आहे. तत्पूर्वी मुलाने आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात. पाहा हा व्हिडिओ, तुम्हाला देखील आवडेल…

हा व्हिडीओ इंडिगो कंपनीच्या विमानाचा आहे आणि पायलटचे नाव अमन ठाकूर आहे. पायलट आई आणि मुलगा एकत्र विमान उडवणार होते, त्याआधी मुलाने सर्वांसमोर आईला फुले देऊन तिचे आभार मानले. तो म्हणाला की वयाच्या 24 व्या वर्षापर्यंत तो त्याच्या आईने उडवलेल्या विमानात प्रवासी म्हणून बसायचा आणि आता तो तिच्यासोबत पायलट झाला आहे, त्यामुळे तो खूप आनंदी आहे. आईने आपल्याला आयुष्यात यशस्वी केले त्याबद्दल त्याने आईचे आभार मानले.

विमानातील प्रवाशांनी देखील त्यांचे टाळ्या वाजवून कौतुक केले. या व्हिडिओला 72 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया देत कमेंट केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!