राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच मनसेला गळती, २० पदाधिकारी घेणार शिवसेनेत प्रवेश

381 0

पुणे – पुणे शहर मनसेला पुन्हा गळती लागली असून मनसेचे 20 पदाधिकारी शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. आणि उद्याच पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रंगणार आहे.

शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. जवळपास 20 पदाधिकारी मनसेतून शिवसेनेत येणार असल्याची माहिती शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम पाहून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नगरसेवक वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक असलेले मनसेचे माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला. पक्षातर्गत गटबाजी आणि वादामुळे पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे संपर्क नेते सचिन अहिर यांची भेट घेतली.

निलेश माझिरे देखील उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. दरम्यान वसंत मोरे यांचे अनेक कट्टर समर्थक शिवसेनेत जाऊ लागल्याने मनसेत मात्र खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!