स्वतःला वेळ द्या
तुम्ही स्वतः खुश आणि समाधानी असाल तर तुम्ही दुसऱ्याला खुश ठेऊ शकता हे सत्य आहे. १ दिवस स्वतःबरोबर घालवा. तुमचे जे काही छंद असतील त्यात वेळ घालावा. खुशाल झोपून राहा. २ कानांचा वापर करा म्हणजे कोणी काही बोललं तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्या. चांगला चित्रपट पहा. मन मोकळं करण्यासाठी एकाद्या मित्र मैत्रिणीशी बोलू शकता.
आकर्षक दिसा
हे वाचताना तुम्हाला थोडे विचित्र वाटेल पण हो छान नीटनेटके दिसण्याकडे लक्ष द्या. पार्लर ला जा. जमल्यास नेहमी पेक्षा काही तरी वेगळा हेअरकट ट्राय करा. जुने चालेल पण स्वच्छ कपडे घाला. विशेष करून ते जे तुमच्या पाटील किंवा पत्नीला आवडतात.
संवाद साधा
हा सर्वात महत्वाचा भाग आहे. नेहमी लक्षात ठेवा तुमच्या दोंघांमध्ये वाद, संभाषण अति वैयक्तिक गोष्टी कोणासोबतही शेअर करूच नका. मित्र मत्रिणीशी मन मोकळा करावे पण सांगताना जोडीदाराची तक्रार करू नका. विशेष करून घरातील आई वडील किंवा सासू सासरे यांच्याशी तर अशा विषयांवर बोलणे टाकलंच पाहिजे. थोडे वाद शांत झाले कि शांतपणे जोडीदाराशी संवाद साधा , अर्ग्युमेंट्स टाळा.
एकमेकांवर माया करा, काळजी घ्या
आयुष्यभर साथ देणार हे एकमेव नातं आहे. एकमेकांच्या इच्छा, गरजा यांची काळजी घ्या. ती तुमची आई नाही, आणि तो तुमचा पिता नाही पण या दोन्ही नात्यांच्या पलीकडचे हे नाते असते. त्यामुळे मायेने एकमेकांना मानसिक , शाररिक आर्थिक आधार द्या. पडत्या काळात सावरून घ्या.
घरात पॉसिटीव्ह फोटो लावा
घरात विशेष करून तुमच्या बेड रुम मध्ये तुमच्या छान आठवणींचे फोटो लावा. जे पाहून तुम्हाला आनंद वाटलं पाहिजे. बेडरूममध्ये देवाचे फोटो लावू नयेत. पण पूर्व पश्चिम राधा-कृष्णाची फ्रेम लावू शकता.