राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाची(MAYOR)आरक्षण सोडत आज मंत्रालयात जाहीर झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. या आरक्षणामुळे अनेक शहरांमधील सत्तेची समीकरणे बदलणार असून, तब्बल 15 महापालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार आहेत.
मुंबई ( MUMBAI ) पुणे (PUNE) नागपूर(NAGAPUR) आणि नाशिक (NASHIK) यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये महापौरपद ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे विविध महापालिकांतील सत्तास्थापना आणि राजकीय गणितांवर शिक्कामोर्तब झाले असून, अनेक ठिकाणी महापौरपद महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहे. तर काही महापालिकांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी संधी उपलब्ध झाली आहे.
महापौरपदाची आरक्षण सोडत पुढील प्रमाणे :
1 बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण- महिला
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई सर्वसाधारण- महिला
5 वसई-विरार सर्वसाधारण-महिला / पुरूष
6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण- महिला / पुरूष
7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण- महिला
8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष
9 पुणे सर्वसाधारण- महिला
10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण- महिला
11 नागपूर -सर्वसाधारण- महिला
12 अहिल्यानगर- ओबीसी- महिला
13 नाशिक-सर्वसाधारण- महिला
14 छत्रपती- संभाजीनगर सर्वसाधारण-महिला किंवा पुरुष
15 अकोला -ओबीसी-महिला
16 अमरावती- सर्वसाधारण- महिला किंवा पुरुष
17 लातूर -अनुसूचित जाती (एससी)- महिला
18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण-महिला
19 चंद्रपूर- ओबीसी- महिला
20 धुळे-सर्वसाधारण- महिला
21 जळगाव -ओबीसी- महिला
22 मालेगाव -सर्वसाधारण-महिला
23 कोल्हापूर -ओबीसी-महिला किंवा पुरूष
24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
25 सोलापूर -महिला / पुरूष
26 इचलकरंजी- ओबीसी- महिला किंवा पुरूष
27 जालना-अनुसूचित जाती (एससी)- महिला
28 पनवेल -ओबीसी- महिला किंवा पुरूष
29 परभणी-सर्वसाधारण-महिला / पुरूष
या आरक्षण सोडतीनंतर आता प्रत्येक महापालिकेत सत्तास्थापन, महापौर निवड आणि राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. आगामी दिवसांत स्थानिक पातळीवरील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.