तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये मास्क सक्ती, गर्दी करू नका ! ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे आवाहन

215 0

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये राज्य सरकारने सावधानतेच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क सक्ती करण्यात आली आहे. संस्थांनच्या वतीने भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की, चीन, अमेरिका, जपानसह अनेक देशांमध्ये कोरोनाची लाट पुन्हा आली आहे. या देशांमध्ये संसर्गाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने आपल्याकडे केंद्र आणि राज्य सरकारने सावधान राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

या संसर्गाचा संभाव्य फैला रोखणे हे शासनाबरोबर आपणा सर्वांचेही कर्तव्य आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथे येणारे भाविक वारकरी ग्रामस्थ आणि अन्य दर्शनार्थी तसेच व्यापक सामाजिक हित विचारात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीने सर्वांना विनम्र आवाहन करण्यात येते की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आणि परिसरात गर्दी करू नये. वयोवृद्ध लहान मुले तसेच आजारी व्यक्ती यांनी शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मंदिर व परिसरात सर्वांनी मास्क घालूनच प्रवेश करावा.

Share This News

Related Post

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठा धक्का; शिशिर शिंदे यांचा राजीनामा

Posted by - June 17, 2023 0
मुंबई: राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली असून यामुळं शिवसेना वर्धापन दिनाअगोदरच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  शिशिर…

शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; प्रकृती स्थिर, मुंबईच्या लीलावतीत उपचार सुरू

Posted by - October 18, 2022 0
औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना काल सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना तातडीनं…

BIG NEWS : शनिवार नव्हे ‘अग्निवार’ ! आधी नाशिक मग वणी नंतर मनमाड; वाहन उलटल्यानं सिलिंडर मिसाइलप्रमाणं उडाले हवेत VIDEO

Posted by - October 8, 2022 0
मनमाड : नाशिकमध्ये आज पहाटेपासून सुरू झालेली अपघाताची मालिका थांबण्याचं काही नाव घेईना. आज पहाटे खासगी बसचा भीषण अपघात होऊन…

TOP NEWS SPECIAL REPORT : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार फिक्स होती का ? फिक्स नव्हती तर काय होती रिस्क

Posted by - October 17, 2022 0
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानं रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतरच भारतीय जनता पक्षानं ही निवडणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *