deepti chaudhari sucide case

सासरच्या छळाला कंटाळून विवाहित अभियंता महिलेची आत्महत्या

82 0

 

पुण्यात (PUNE) पुन्हा एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित अभियंता महिलेने आत्महत्या केल्याची घटना उरुळी कांचन तालुक्यातील( URALI KANCHAN) सोरतापवाडी( SORATAPVADI) येथे घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी( DEEPTI  (वय अंदाजे 30)असे मृत महिलेचे नाव आहे. २५ जानेवारी रोजी दीप्तीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि दीर अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत दीप्तीची सासू सरपंच असून सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे.

दीप्तीचे (DEEPTI) लग्न 23 नोव्हेंबर 2019 रोजी रोहन चौधरी याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत होते. मात्र त्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत छळ सुरू केला. सासरच्या मंडळींकडून अपमानास्पद वागणूक, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे

सततच्या छळामुळे दीप्तीने(DEEPTI ) टोकाचा निर्णय घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!