अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस पेटली, ७ जणांचा मृत्यू तर १३ जखमी, कलबुर्गी येथील घटना

398 0

कलबुर्गी- खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापुरा शहराजवळ आज, ३ जून रोजी पहाटे 6.30 च्या सुमारास घडला.

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापुरा शहराजवळ झालेल्या एका रस्ते अपघातात खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना शुक्रवारी, ३ जून रोजी पहाटे घडली, असे पोलिसांनी सांगितले. बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या अपघातानंतर ही आग लागली होती. गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या या बसमध्ये सुमारे 35 प्रवासी होते आणि या घटनेनंतर ती जळून खाक झाली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील रहिवासी असलेले हे प्रवासी गोव्याला पर्यटनाला गेले होते. गोव्यातील पर्यटनस्थळाला भेटी देऊन हे सर्वजण बसमधून हैद्राबादला जाण्यासाठी निघाले असताना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कमलापुरा शहराजवळ आज पहाटे हा अपघात घडला.

भरधाव वेगातील बसने एका टेम्पोला धडक दिली. त्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे ही बस पुलावरून खाली कोसळली. त्यानंतर या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे समजताच २२ प्रवाशांनी स्वतःची सुटका करून घेतली. मात्र बसमध्ये ७ ते ८ प्रवासी अडकून पडले. जखमींना कलबुर्गी येथील विविध रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टेम्पोचा चालकही गंभीर जखमी झाला आहे.

कलबुर्गी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ईशा पंथ यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार जळालेल्या बसमध्ये ७ ते ८ प्रवासी अडकले असल्याचा संशय आहे. “तथापि, या दुर्घटनेतील मृतांची नेमकी संख्या सांगणे शक्य नसल्याचे ईशा पंथ म्हणाल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!